Pimpri Chinchwad Education: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘बालभारती’ची पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांच्या दारी; पिंपरी-चिंचवडमध्ये मोफत वितरणाला सुरुवात
पिंपरी: ‘बालभारती’कडून इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके आलेली आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत सोमवारपासून (ता.८) शुक्रवारपर्यंत (ता. १२) ही पुस्तके शाळेत विनामूल्ये वितरीत केली जात आहेत. प्राथमिक शिक्षणाचा प्रसार करणे, शिक्षणातील गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्या आदेशानुसार ही कार्यवाही होत आहे. Success Story: जुन्नरच्या सिद्धीने गाठले आकाश! अवघ्या २०व्या […]
